· नागपूर वागळता विभाग टँकर मुक्त
· नगरपरिषद क्षेत्रात केवळ १५४ टँकर सुरू
नागपूर :- टंचाईग्रस्त व टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या गावांसाठी राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांमुळे नागपुर विभागात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करणे सहज शक्य झाले आहे. नागपूर जिल्ह्यातील केवळ एकोणीस टँकर वगळता विभागात एकही गावात टँकर सुरू झालेला नाही टँकर मुक्त विभाग ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना विभागात साकार झाली आहे.
पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी गावनिहाय त्यांचाही कृती आराखडा तयार करण्यात आला आहे हा आराखडा चार टप्प्यात राबविण्यात येत आहे सध्या ऑक्टोबर ते जून 2026 या अंतर्गत विभागात 921 गावांसाठी 8 हजार 433 उपाययोजना प्रस्तावित केले आहे.
विभागात सध्या नागपूर जिल्ह्यातील हिंगणा रामटेक व नागपूर तालुक्यातील तीव्र टंचाई असलेल्या केवळ 19 गावांमध्येच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी 3 हजार 668 गावांमध्ये यापूर्वीच उपाय योजना करण्यात आली आहे यामध्ये प्रामुख्याने नळाद्वारे पाणीपुरवठा सार्वजनिक हात पंप तसेच सार्वजनिक विहिरी व बोरवेल मार्फत पिण्याच्या पिण्याचे पाणी आवश्यकतेनुसार प्रत्येक गावात उपलब्ध करून देण्यात आले आहे पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटी करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आल्यामुळे प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई वर मात करणे सुलभ झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टंचाई मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात केली होती या अंतर्गत पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करून सर्व गावे पंचायत मुक्त करण्याचे धोरण ठरविण्यात आले होते. या उपक्रमाला प्राधान्य दिल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग या माध्यमातून जलयुक्त शिवार ही योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचली असून जनतेनेही सहयस्फूर्तीने नदी व नाल्याद्वारे वाहून जाणारे पाणी आडविण्यासाठी विविध उपक्रम राबविले होते. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा वाटा व सहभाग लाभला आहे या उपक्रमाची फल श्रुती म्हणजे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत विक्रमी वाढ झाली आहे.
विभागातील 3668 ग्रामपंचायत मध्ये 16 लाख 95 हजार 580 घरांना नळ जोडणी करण्यात आली आहे तसेच 55000 974 हात पंप व 23 हजार 765 सार्वजनिक विहिरींच्या माध्यमातून 73 लाख लोकसंख्येला नियमित पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यातही पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी होण्यास तसेच काही गावांमध्ये कायमस्वरूपी टंचाई मधून बाहेर पडण्यास मदत झाली आहे.
विभागातील नगर परिषद क्षेत्रात 154 टँकर
विभागातील महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून विभागातील 83 नगर परिषद क्षेत्रात केवळ 154 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तीव्र उन्हाळा असूनही नगर परिषद क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात नळ जोडणी चा कार्यक्रम राबविण्यात आला असून नळ जोडणी द्वारे सीमारे 30 लाख 65 हजार लोकसंख्येला तीन लाख 12 हजार 369 नळ जोडणी द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 11हजार 164 सार्वजनिक खात पंप व 1 हजार 758 विहिरीद्वारे टंचाई कृती आराखडा अंतर्गत पाणीपुरवठा नियमित सुरू करण्यात आला आहे.
नगरपरिषद क्षेत्रातही जलयुक्त शिवार अभियानाची कामे घेण्यात आली असून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट करण्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. नागपूर व चंद्रपूर महानगरपालिका 40 नगरपरिषदा तसेच 43 नगरपंचायती साठी टंचाई कृती आराखडा राबविण्यात आला आहे.
जून अखेर पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले असून त्यानुसार गरज असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुका निहाय आराखडा तयार असून त्या अंतर्गत प्रत्येक गावाला आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही जलयुक्त शिवार अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे प्रत्येक गाव जल स्वयंपूर्ण व्हावे तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई व शेतीच्या शाश्वत सिंचनासाठी पावसाचे वाहून जाणारे पाणी आडविण्यासाठी विविध उपाय योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देण्यात आले आहे टँकर मुक्त महाराष्ट्र ही संकल्पना या प्रभावी व परिणामकारक उपाययोजनांमुळे पूर्ण होणार आहे.