spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

यवतमाळ येथे २ जून रोजी डाक अदालत

Ø टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर तक्रारींचे निवारण होणार

यवतमाळ :- यवतमाळ विभागाच्या अधीक्षक डाकघर कार्यालयाच्या वतीने दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता अधीक्षक डाकघर कार्यालय, पहिला माळा, यवतमाळ येथे यडाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे.

पोस्टाच्या कार्यपद्धती किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निवारण झालेले नाही अथवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, पार्सल, बचत बँक तसेच मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत.

तक्रारी करताना संबंधितांनी संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. त्यामध्ये तक्रारीची तारीख, मूळ तक्रार ज्या अधिकाऱ्यास पाठविण्यात आली त्यांचे नाव व पदनाम आदी माहितीचा समावेश असावा.संबंधितांनी आपल्या तक्रारीच्या दोन प्रती अधीक्षक डाकघर, यवतमाळ ४४५००१ यांच्या नावे दि. १ जून २०२६ पर्यंत किंवा तत्पूर्वी पोहोचतील अशा रीतीने पाठवाव्यात. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे आवाहन अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

देशामधील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग असून प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये पोस्टाच्या सेवेबद्दल वेगळे स्थान निर्माण झाले आहे. पोस्ट खाते नागरिकांना उत्तम सेवा देण्याबरोबरच ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान करण्याचा प्रयत्न करीत असते. मात्र, सेवा देताना पत्रव्यवहार अथवा विविध सेवांमधील त्रुटींमुळे काहीवेळा तक्रारी निर्माण होतात. या तक्रारींचे योग्य प्रकारे निवारण करण्यासाठी पोस्ट विभागाकडून वेळोवेळी “डाक अदालत” आयोजित करण्यात आले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर यांनी दिली.

Popular Articles