कामठी :- कामठी तालुक्यातील पेट्रोल पंपावर डिझेल क्यान (डबकी)मध्ये देण्यास मनाई करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या कामठी तालुक्यात मान्सूनपूर्व शेतीची कामे सुरू असून ट्रेकटर ,पंप व इतर शेती अवजारे चालवण्यासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता भासत आहे मात्र डबकीत डिझेल मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत .सध्या सर्वत्र डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी डबकीत डिझेल नेऊन त्याची जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.या पाश्वरभूमीवर पेट्रोलपंपचालकांना क्याणमध्ये डिझेल देऊ नये असे आदेश असल्याचे सांगण्यात येते. मात्र शेतकऱ्यांच्या शेतकामाचा हंगाम लक्षात घेता नियमांमध्ये शिथिलता देऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन किमान शेतकऱ्यांना तरी डबकीत डिझेल द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
डबकीत डिझेल बंदीमुळे शेतकरी अडचणीत
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.