कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या उनगाव येथील सुनील फेरो अँड एनर्जी प्रायवेट लिमिटेड कंपनी विरोधात कंपनिमुळे प्रदूषण होते या कारणावरून 20 मे ला आंदोलनककाऱ्यांनी आंदोलन पुकारले होते दरम्यान. जोमाने नारेबाजी करून कंपनीत येणारे ट्रक थांबवून अडथळा निर्माण करून कंपनीच्या लोखंडी गेट उघडून जमावतील लोकांनी आतमध्ये प्रवेश करून कंपनीतील काम करणाऱ्या लोकांना मॅनेजर व डायरेकटर यांना धमकावून हम कंपनी नही चलने देंगे अशी धमकी देत आंदोलन केले.यासंदर्भात कंपनी प्रबंधक 36 वर्षीय हरिओम कृष्णकांत चतुर्वेदी ने स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी 30 आंदोलनकारि विरुद्ध कलम 329(3),126(2),351(2),189(2),191(2),190 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केलेल्या आंदोलन कारीत नागपूर जील्हा परिषद च्या माजी सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे, माजी सरपंच डुमदेव नाटकर,माजी सरपंच अरुण आखरे, देवानंद कांबळे, तुकाराम धोबले,लक्ष्मण डवरे,आशिष कांबळे,सचिन मांगे, पंकज डवरे,अनिकेत डवरे,रोशन डवरे,चंद्रशेखर कांबळे,प्रफुल डवरे,रामभाऊ कांबळे,रामभाऊ डवरे,ईश्वर कांबळे,प्रवीण मेश्राम, संजु डवरे,हंसराज बावणे,रोहित डवरे,भिकु डवरे,आकाश डवरे,आदित्य शिंदेंमेश्राम,चंद्रशेखर मारबते,मारोती मारबते,पंकज मांगे, साहिल डवरे, रोशन मांगे,सतीश मांगे,राज बावणे चा समावेश आहे.
उनगावच्या सुनील फेरो अँड एनर्जी कंपनी विरोधात आंदोलन करणाऱ्या 30 आंदोलनकारी विरुद्ध गुन्हा दाखल









