spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर विधानपरिषद निवडणुकीत ‘भावी’ सदस्य मतदानापासून वंचीत!

संदीप कांबळे, कामठी :-18 जुनं ला होऊ घातलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत विद्यमान नगरसेवकामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.मात्र दुसरीकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका वेळेवर न झाल्यामुळे कामठी तालुक्यातील भावी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती आपल्या हक्काच्या मतदानापासून वंचीत राहणार आहेत.यामुळे कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात आणि भावी उमेदवारात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूर विधानपरिषद सदस्यचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2024 रोजी संपुष्टात आला होता या रिक्त जागेसाठी 18 जून ला निवडणूक होत असून कामठी तालुक्यातील मतदारासाठी एकमेव कामठी तहसील कार्यालय मतदान केंद्र आहे. या निवडणुकीत कामठी तालुक्यातील 100 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यानुसार कामठी नगर परिषद चे 39 नगरसेवक , छावणी परिषद कामठी चे 1 नगरसेवक,महादुला नगरपंचायतचे 20 नगरसेवक,येरखेडा नगर पंचायत चे 20 नगरसेवक ,बिडगाव तरोडी पांढुर्ण नगरपंचायत चे 20 नगरसेवक मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये 100 पैकी 89 नगरसेवक व 11 मनोनीत सदस्य सह नगराध्यक्षांचा समावेश आहे. . गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेत अडकून पडल्या आहेत. या निवडणुका कधी होणार याकडे ग्रामीण भागातील भावी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती इच्छुकांचे डोळे लागून राहिले होते मात्र या निवडणुका होण्यापूर्वीच विधानपरिषद ची निवडणूक जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील पुढाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.निवडणुका वेळेवर झाल्या असत्या तर आज आम्हालाही विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला असता मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि न्यायालयीन पेचामुळे आमच्यावर अन्याय होत आहे अशी खंत प्रस्तुत प्रतिनिधी कडे बोलून दाखवले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.