spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नीट यु जी प्रकरण: केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा- नगरसेवक अनिल सूर्यवंशी

कामठी :- नीट युजी 2026 परीक्षा रद्द करण्याच्या घडामोडीचा तीव्र निषेध करीत 22 लक्ष विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेल्याने एन टी ए च्या विश्वासहर्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करीत पेपरफुटीची पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या ,परीक्षा प्रणालीचे विकेंद्रीकरणं करून राज्यांना अधिक अधिकार द्या,नीट युजी परीक्षा सुरक्षा व डिजिटल प्रणालीत सुधारणा करा व नीट युजी प्रकरणात शिक्षणमंत्र्यानी नैतिक जवाबदारी बस्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी प्रभाग क्र 4 चे नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी केली आहे. 21 जून 2026 रोजी नियोजित असलेल्या फेर परोक्षेसंदर्भात योग्य विद्यार्थी स्नेही व्यवस्था आणि स्पष्ट संवाद ,बाधित विद्यार्थी आणि पालकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन आणि कल्याणकारी साहाय्य प्रणाली, विद्यार्थ्यांच्या हितासाठी तात्काळ सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा अशी मागणी नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे केली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.