spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

टेमसना येथे शेती उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन

कामठी :- कामठी तालुक्यातील टेमसना येथे तालुका कृषी अधिकारी, कामठी अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून बचत गटातील महिला शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबाबत अश्विनी साखरे (सहाय्यक कृषी अधिकारी ) यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यात हवामान बदलास अनुकूल शेती तंत्रज्ञान, दशपर्णी अर्क व निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच शाश्वत शेती व उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्याच बरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत विविध घटकांसाठी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करून लाभ घ्यावा याबाबत अश्विनी साखरे (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी आवाहन केले.सोबतच घरगुती चाचणी पद्धतीने सोयाबीन उगवण क्षमता तपासणी,बीज प्रक्रिया मोहीम व खरीप हंगाम पूर्व व खरिपातील प्रमुख पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारबाबत मोहीम घेण्यात आली. शेतकऱ्यांना बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच बीज प्रक्रिया करण्याची योग्य पद्धत( FIR) शेतकऱ्यांना सांगण्यात आली. खरीप हंगामातील प्रमुख पिकांबद्दल चर्चा व पीक लागवड नियोजन बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. मिश्र पिक पद्धत, अंतरपिक पद्धत, DSR, SRT पद्धतीने धान लागवड, रुंद सरी वरंबा पद्धतीने कापूस लागवड,तसेच बेडवर पऱ्हे लागवड, हिरवळीच्या खताचा वापर व महत्व, बाबत समजावून सांगण्यात आले. तसेच बचत गटातील महिलांना PMFME अंतर्गत मिळणाऱ्या अनुदान बाबत माहिती दिली. यावेळी शालिनी भोयर (महिला बचत गट अध्यक्ष ), सोनाली चहांदे (महिला बचत गट सचिव), यश भोयर (स्वयंसेवक), स्वाती डेरे (समूह सहायक),सुशीला बावनगडे, विकास चहांदे, अनिता शहाणे, ई. महिला शेतकरी उपस्थित होते.

Popular Articles