नागपूर :- नारा घाट परिसरात 800 मिमी व्यासाच्या ओम नगर फीडर (पेंच 4) लाईनवर गळती आढळून आली आहे. सदर गळती दुरुस्तीसाठी तातडीने आपत्कालीन शटडाउन घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
या गळतीमुळे व दुरुस्तीच्या कामामुळे खालील कमांड एरिया (CA) मधील सायंकाळचा व सकाळचा पाणीपुरवठा दिनांक २८ मे, २०२६ रोजी प्रभावित होणार आहे :
१. नारा CA :
ओम नगर, आर्य नगर, नारा वस्ती, प्रीती सोसायटी, एकता कॉलनी, आराधना कॉलनी, आदर्श कॉलनी, नूरी कॉलनी, नटराज सोसायटी, अलंकार सोसायटी, साई प्रसाद सोसायटी, तवक्कल सोसायटी, संत ज्ञानेश्वर सोसायटी, शिवकृष्ण धाम सोसायटी, इंडियन सोसायटी, कोहिनूर सोसायटी, बद्रीनाथ सोसायटी.
२. नारी CA :
शेंडे नगर, आवळे नगर, सहयोग नगर, रमाई नगर, कपिल नगर, कामगार नगर, नालंदा नगर, KGN स्वर्ण नगर, काशी नगर, तक्षशिला नगर, नारी गाव, राजगृह नगर, मयूर नगर, समर्थ नगर, बाबादीप सिंग नगर, बँक कॉलनी, सान्याल नगर, उत्कर्ष सोसायटी.
३. जरीपटका CA :
भीम चौक, HUDCO कॉलनी, नागार्जुन कॉलनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, खुशी नगर, LIG कॉलनी, MIG कॉलनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सान्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर, मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहुजी नगर, CMPDI रोड, इंदिरा नगर, अंगुलीमाल नगर, KK नगर, आहुजा नगर, जागृत नगर, नागसेन नगर, बाबादीप सिंग नगर, नारा घाट परिसर, बाल वस्ती गृह.
४. नारा NIT CA :
पांजरा परिसर, विश्वभारती सोसायटी, शबिना सोसायटी, इरॉस सोसायटी, रिलायन्स सोसायटी, उमंग कॉलेज परिसर, समता नगर, गंगोत्री लॉन.
दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून शक्य तितक्या लवकर नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे व पाण्याचा जपून वापर करावा, ही विनंती.
पाणीपुरवठा किंवा बिल भरण्याबाबत अधिक माहिती अथवा मदतीसाठी, ग्राहक NMC–OCW हेल्पलाइन क्रमांक 1800 266 9899 वर संपर्क साधू शकतात, contact@ocwindia.com या पत्त्यावर ईमेल करू शकतात किंवा Play Store अथवा App Store वरून ‘Nagpur Jal Grahak Sewa App’ डाउनलोड करू शकतात.



