spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवतपाच्या तापत्या उन्हात, धक धकत्या अग्नीकुंडाच्या मधात अग्नितपस्या, दर्शणार्थ्यांची मंदीयाळी

खापा, वार्ताहर :- जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात स्थित वाकी येथील ऐतिहासिक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र संत बाबा ताजुद्दीन दर्गा येथील हायकोर्ट दर्गा परिसरात ‘त्यागी गुलाम ए ताज’ कठोर तप करीत आहे. ही तपस्या लोककल्याण विश्वशांतीसाठी करण्यात येत असल्याचे सांगितले. या नवतपाच्या तापत्या उन्हाळ्यात चोहीबाजूने गोलाकारात धक धक करत असलेल्या नऊ अग्निकुंडाच्या मधात सकाळी दहा वाजता पासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत बसून कठोर साधना करत आहे.

ही अग्नीतप साधना शुक्रवार दि. २२ मे पासून सुरू झाली असून, ती सोमवार दि. १ जून पर्यंत चालणार आहे. या तपस्येसह मौनव्रत ही धारण केले आहे. या तापत्या नवतप्याच्या उष्णता सोबत अग्नि कुंडाची उष्णता आणि धुराच्या वर्तुळात ते मध्यभागी मौनधारण करून साधनेत आहे. या कठीण आणि अलौकिक अग्नितपाची माहिती मिळताच वाकी दर्गा परिसरात शेकडो भक्त दर्शनासाठी गर्दी करत आहे. त्यामुळे दर्गा परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

“परिवार सोडून झाले, ईश्वर सेवेत समर्पित”

गुलाम-ए-ताज यांचे नाव लीलाधर पालणुजी सोमकुवर (वय ६६ वर्ष) असून ते मूळचे वाडी येथील रहिवासी आहे. त्यांना पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, जावई, सुना आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे. इतका मोठा परिवार सोडून ते लोककल्याण व अध्यात्मासाठी आणि ईश्वराच्या सेवेत लागले. ते मागील १५ ते १६ वर्षापासून वाकी येथे स्थित हायकोर्ट दर्गा समोरील परिसरात निवासी आहेत. तिथे आश्रम बांधून बाबा ताजुद्दीनच्या येणाऱ्या भक्तांची सेवा करत असतात.

“या अगोदरही केली, अशी साधना”

या पूर्वीही लोककल्याण विश्वशांतीसाठी मध्यप्रदेश छिंदवाडा येथील दादाजी धुनिवाले यांच्या दरबारात अशीच तपसाधना २८ मे २०१३ ला सुरवात करून ५ जून २०१३ पर्यंत केली होती.

Popular Articles