spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ट्रकच्या धडकेत दुचाकी वाहन चालकाचा मृत्यु

– खंडाळा शिवारात भीषण अपघात, दोन ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा खंडळा शिवारात पडोळे ढाब्या समोर ट्रकच्या धडकेत दुचाकी वाहन चालक विक्की महल्ले याचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी दोन्ही ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहिती नुसार कुणाल जयराम भडंग वय ३२ वर्ष रा. राधाकृष्ण नगर कन्हान आणि साळा विकी सुदर्शन महल्ले वय २८ वर्ष, रा. येसंबा (सालवा) या दोघांनी लिहीगांव येथे दर्पण ढाबा सुरु केला आहे. बुधवार (दि.२७) मे ला पहाटे ३.४५ वाजता लिहीगांव येथिल ढाबा बंद करून कृणाल आपल्या स्विफ्ट कार क्र.एम.एच.३१, ई.ए.७८२३ ने त्याचा मित्र सुनिल सुखराम मेश्राम वय ४५ वर्ष रा. छोटी अजनी, साई मंदिरच्या मागे याला घेऊन व कृणाल चा साळा विकी सुदर्शन महल्ले हा आपली दुचाकी वाहन मॅस्ट्रो मोपेड क्र.एम.एच.४०, ए.एस.४१७७ असे तिघेही सोबत निघाले.

खंडाळा बॉयपास अंडरब्रिज पासुन साळा आपल्या मॅस्ट्रो मोपेड ने तारसा मार्गे घरी जाण्याकरिता निघाला. कृणाल आणि त्याचा मित्र रितीक ढाबा जवळ थांबले तेथे मित्र प्रदिप भुरे हा घरी जाण्याकरिता साधन पाहत होता. त्यास गाडीत बसवुन त्या दोघां ना छोटी अजनी येथे सोडण्यास गेला. तेवढ्यात प्रदिप भुरे त्याचे मोबाईलवर फोन आला की, खंडाळा मार्गा वर पडोळे ढाब्या समोर पांढरी आणि लाल रंगाचा मॅस्ट्रो गाडीचा अपघात झाला. कृणाल मित्रासोबत घटनास्थळी गेला असता तेथे त्याचा साळ्याची मॅस्ट्रो मोपेड वाहन समोरुन चेपकलेल्या अवस्थेत दिसुन आली आणि महामार्गच्या बाजुला साळा पडलेला असुन त्याचे तोंडामधुन व नाकातुन रक्त निघत होते. तेथील लोकांनी सांगितले कि, पडोळे यांचे बंद ढाब्या वर ट्रक क्र एमएच ४० डीसी. ६९६२ हा उभा होता. तेव्हा कन्हान कडुन तारसा येथे जाणाऱ्या ट्रक क्र. एम एच ३३ टी ११२२ चे ट्रक चालकाने इंडीकेटर न देता अचानक पडोळे ढाब्याकडे वळन घेतल्याने साळा यांचे मॅस्ट्रो मोपेड ला कट लागुन ती मॅस्ट्रो गाडी उभा असले ला ट्रक क्र एमएच ४० डीसी. ६९६२ ला धडकल्याने कृणालचा साळा जख्मी झाला. जख्मीला स्विफ्ट कार ने कामठी उपजिल्हा रुग्णालय नेले असता तेथील डाॅक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

ट्रक क्र. एमएच ३३ टी ११२२ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने आणि निष्का ळजी पणाने चालवुन आणि ट्रक क्रं. एमएच ४० डीसी. ६९६२ च्या चालकाने आपले वाहन अनाधिकृतपने पार्क करून अपघातास कारणीभुत झाल्याने कन्हान पोलीसांनी कृणाल भडंग याच्या तक्रारीवरून दोन्ही ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Popular Articles