spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमती तत्काळ कमी कराव्यात – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खा.डॉ.प्रशांत पडोळे यांचे लेखी निवेदन

हंसराज,भंडारा :- देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अत्यंत कठीण झाले असून पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींमुळे जनतेचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवून इंधन दरवाढ तात्काळ कमी करण्याची मागणी केली आहे.

खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांचा थेट परिणाम शेती, वाहतूक, किराणा, बांधकाम, उद्योग तसेच सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. शेतकरी वर्ग आधीच नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्च व बाजारातील अस्थिरतेमुळे अडचणीत सापडला असताना डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेती करणे अधिकच खर्चिक झाले आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरवाढीमुळे महिलांचे घरगुती बजेट पूर्णपणे विस्कळीत झाले असून सामान्य कुटुंबांना दोन वेळचे जेवण बनविणे देखील कठीण झाले आहे.

सर्वसामान्य जनता महागाईच्या ओझ्याखाली दबली जात असताना केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती कमी कराव्यात, अशी जोरदार मागणी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी केली आहे. तसेच वाढत्या महागाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत असून जनतेला दिलासा देण्यासाठी त्वरित निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

“देशाचा सामान्य नागरिक आज प्रचंड आर्थिक संकटातून जात आहे. गरीब, शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. सरकारने जनतेच्या भावना समजून घेत तात्काळ इंधन दर कमी करून दिलासा द्यावा,” अशी भावनिक मागणीही खा.डॉ.प्रशांत पडोळे यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.

Popular Articles