spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा कार्यालय, भंडारा यांना उत्कृष्ट राजभाषा पुरस्कार

हंसराज,भंडारा :- आयुध निर्माणी कार्यालय, भंडारा यांच्या संयोजनाखाली कार्यरत “नगर राजभाषा कार्यान्वयन समिती (नराकास), भंडारा” आयोजित अर्धवार्षिक बैठकीत सन 2025-26 करीता बँक ऑफ इंडिया, अग्रणी जिल्हा कार्यालय, भंडारा यांना उत्कृष्ट राजभाषा अंकार्यान्वयन बद्दल तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा सन्मान नराकास अध्यक्ष दीपक देशमुख तसेच भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभाग, प्रादेशिक कार्यान्वयन कार्यालय (पश्चिम), मुंबई येथील सहाय्यक निदेशक प्रमोद सांगोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचा स्वीकार अग्रणी जिल्हा प्रमुख राजू नंदनवार आणि राजभाषा अधिकारी सुश्री ओशीन शेख यांनी केला.

यावेळी समितीमार्फत कार्यालयात हिंदी भाषेचा प्रभावी वापर, राजभाषा धोरणाची यशस्वी अंमलबजावणी तसेच विविध राजभाषा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग याबद्दल गौरव करण्यात आला. ही उपलब्धी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले.

अग्रणी जिल्हा कार्यालय, भंडारा यांनी भविष्यातही राजभाषा हिंदीच्या प्रसार-प्रचारासाठी तसेच तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.