कामठी :- स्थानिक नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र 4 येथील नागसेन नगर ,हबाबपुरा व मोठ्या मस्जिद जवळ परिसररातील बहुतांश भाग हा दलित वस्तीत समावेशक असून दलित वस्त्यांचा विकास व्हावा या मुख्य उद्देशाने शासनाकडून दरवर्षी नगर परिषदला करोडो रुपयाचा निधी प्राप्त होत असतो मात्र येथील नगर परिषद प्रशासनाच्या कामचुकार कार्यप्रणालीमुळे या दलित वस्तीत अजूनही पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आहे. ज्यामुळे नागरिकांचो ‘घरी नळ तरी पाण्याचा रड’अशी अवस्था आहे .
यासंदर्भात परिसरातील पाण्याच्या समस्याने ग्रस्त नागरिकांच्या वतीने प्रभाग क्र 4 चे नगरसेवक अनिल सूर्यवंशी यांच्या वतीने मुख्याधिकारी विनोद जाधव यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
पूर्वी कामठी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद ला महानगर पालिकेकडून पाणी विकत घ्यावे लागत होते त्यातही फक्त 3.6दशलक्ष लिटर्सप्रतिदिन इतकेच पाणी मिळत होते त्यामुळे कामठी शहरात पाण्याची भीषण टंचाई होती यावर मात करण्यासाठी शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय व्हावी यासाठी माजी राज्यमंत्री एड सुलेखाताई कुंभारे यांनी आंदोलने केली व या संघर्षशील नेतृत्वाने कामठी शहरासाठी स्वतंत्र प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळवीत 28.25कोटीच्या निधीतून 16 एप्रिल 1998 ला तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे,तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.नितीन गडकरी , माजी राज्यमंत्री एड सुलेखा कुंभारे यांच्या मुख्य उपस्थितीत कामठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे मोठ्या थाटात भूमिपूजन करण्यात आले होते.तर 19 डिसेंबर 2001 ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख , तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांच्या शुभ हस्ते या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले यानुसार शहरव्यतिरिक्त आजनी, गादा,घोरपड, रनाळा व येरखेडा ह्या पाच गावाला ही पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली होती ज्या माजी राज्यमंत्रीच्या अथक प्रयनातून शहरात स्वतंत्र पाणी पुरवठा ची सोय करीत शहरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात आला त्याच सुलेखाताईचे वास्तव्य असलेल्या कामठी शहरातील प्रभाग क्र 4 मध्ये अजूनही पाण्याचा ठणठणाट असून प्रभाग क्र 4 च्या बहुतांश भागात पाण्यासाठी वणवण भटकंती करावे लागते ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल… तेव्हा प्रभाग क्र 4 ची पिण्याच्या पाण्याची समस्या त्वरित मार्गी लागावे यासाठी निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अनिल सूर्यवंशी, कामठी नगर परिषद चे विरोधी गट नेता काशिनाथ प्रधान, नगर सेविका सातीका खांडेकर, क्षमा खांडेकर, दिशा पिल्लै, पौर्णिमा बागड़े, शारदा नागदेवे,सीमा नागदेवे, भारती वासनिक, अनीता सिंघाड़े आदी नागरिक गण उपस्थित होते.



