– झोपेची डुलकी ठरली अपघातास कारणीभूत
सचिन चौरसिया, रामटेक :- जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या भरधाव मालवाहक टेम्पोच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन महामार्गाखाली उतरून थेट रस्त्यालगच्या झाडावर जोरदार आदळले. यात एकाच्या मृत्यू तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला.
राष्ट्रीय महामार्गवर (एनएच ४४) जबलपूरकडून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या भरधाव मालवाहक टेम्पोच्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. झालेल्या अपघातात व्यावसायिकाच्या मृत्यू झाला तर टेम्पो चालक गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवार (दि.२७) मे रोजी दुपारी ३ वाजता देवलापार पोलीस स्टेशनजवळ घडली. मो. मतीन मो. इसा (वय ५० रा. छत्रपती संभाजी नगर ) असे मृताचे नाव असून, शेख नदीम शेख कबीर (वय ३९) हा जखमी झाला. जबलपूरकडून नागपूरकडे येणारे एमएम – -२०-ईजी-३६२७ क्रमांकाचे मालवाहक टेम्पो जबलपूर बाजारपेठेत भाजीपाला विकून परत येत होते. चालकाला डुलकी आल्याने वाहन अनियंत्रित होऊन वाहन महामार्गाखाली उतरून थेट रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार आदळले. धडक इतकी जोरदार होती की कॅबिनमध्ये बसलेले मालक मोहम्मद इसा हे समोरील काचेवर आदडले त्यात त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला. तर चालक नदीम शेख हा गंभीर जखमी झाला असून देवलापार ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.



