spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्गाची मागणी

कन्हान :- महामहीम राष्ट्रपती महोदय यांना मुख्याधिकारी नगरपंचायत कान्द्री (कन्हान) यांच्या मार्फत निवेदन पाठवुन दरवाढ कमी करून महागाई वर अकुंश लावावा. तसेच डिजिटल जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र प्रवर्गात नोंद करण्याी मागणी करण्यात आली.

केंद्र शासनाकडुन सातत्याने होत असलेल्या डिझेल, पेट्रोल व गॅस इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कामगार वर्गावर वाढत चालले ल्या महागाईच्या ताणाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. वाढत्या इंधन दरामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन जगणे कठीण होत असुन शासनाने तातडीने दरवाढ नियंत्रणात आणुन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच सध्या सुरू असलेल्या डिजिटल जनगणना प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग, स्वतंत्र कोड व स्वतंत्र रकाना उपलब्ध नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

अनुसूचित जाती व जमातीप्रमाणेच ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद होणे आवश्यक असुन त्याशिवाय ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या शासनाकडे उपलब्ध होणार नाही, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या उपलब्ध नसल्यास भविष्यात विविध शासकीय योजना, शैक्षणिक सुविधा, नोकरीतील आरक्षण व राजकीय प्रतिनिधि त्व यामध्ये समाजावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले. यास्तव शासनाने तात्काळ दखल घेऊन डिजिटल जनगणना मोबाईल अँपमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग व कोड उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर विविध पदाधिकारी व नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असुन परिसरात या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. या मागणीचे निवेदन महामहिम राष्ट्रपती महोदय यांना मुख्याधिकारी नगरपंचायत कान्द्री (कन्हान) यांच्या मार्फत निवेदन सादर करताना बलवंत पडोळे, राजु देशमुख, निकेश मेश्राम, महेश झोडावणे, नितु परते, शुभांगी कुंभलकर, चंद्रशेखर बावनकुळे, गणेश सरोदे, भुपेंद्र पोटभरे, विक्की पारधी, बंटी परते, अश्विन अंबादे सह नागरिक उपस्थित होते.

Popular Articles