spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

डी.के.कॉन्व्हेंट शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

नागपूर :- सेमिनरी हिल्स येथील श्री दादाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था नागपूर अंतर्गत संचालित डी. के. कॉन्व्हेंट इंग्लिश प्रायमरी, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात नागपूर विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य रमेश चोपडे यांच्या शुभ हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग क्र. १४ च्या नगरसेविका योगिता तेलंग व माधुरी टेकाम (फूलसुंगे) प्रामुख्याने उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यात अधिक परिश्रम घेऊन यशाची नवी शिखरे गाठण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचे योगदानही मोलाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाच्या ध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भांगे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव राजेश भांगे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा भांगे, शिक्षकवृंद, पालक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कारामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, भविष्यातही शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शाळा प्रशासनाने यशस्वीरीत्या पार पाडले. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रवीण काळे यांनी कळविले आहे.

Popular Articles