spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोदामेंढी येथे भाजपा तालुका मौदा मंडळातर्फ आणीबाणीची 51 वी वर्षपूर्ती- काळा दिवस कार्यक्रमाचे आयोजन

किशोर साहू, मौदा :- गुरुवार (ता.25 जून)ला भारतीय जनता पार्टी मौदा मंडळाच्या वतीने कोदामेंढी येथे ‘आणीबाणीची ५१ वी वर्षपूर्ती – काळा दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

देशाच्या लोकशाही इतिहासातील काळा अध्याय असलेल्या आणीबाणीच्या काळातील अत्याचारांचे स्मरण करतानाच, लोकशाही मूल्यांचे जतन आणि संविधानिक संस्थांच्या बळकटीकरणाचा संकल्प यावेळी करण्यात आला. कार्यकर्त्यांनी त्या काळातील संघर्ष, त्याग आणि लोकशाही पुनर्स्थापनेसाठी ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या योगदानाचा इतिहास उजाळा दिला. लोकशाहीचे रक्षण, राष्ट्रहिताची जपणूक आणि जनसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्याच्या संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत,भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान,भाजपा जिल्हा महामंत्री राहुल किरपान,भाजपा मंडळ अध्यक्ष मौदा भगवान बावनकुळे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नरेश मोटघरे,भाजपा शहर अध्यक्ष मौदा मोरेश्वर सोरते,अशोक हटवार,मुकेश अग्रवाल,चांगो तिजारे,नरेश बावनकुळे, तिलक दंडारे, रामेश्वर लिचडे,देवेंद्र कोंगे,विरेंद्र पायतोडे, रोशन उमप, विष्णू देशमुख, निलेश बावनकुळे, आनंद लेंडे,

विनोद मदनकर,गोपाल गिरमेकर, रेवा देशमुख,नेकसिंग गहेरवार,विनोद गभने,विनोद कारेमोरे,अमोल नरोले, अमित तिल्लीखेडे,सुनिल आडगूळकर,रामश्री गजभिये, रामपाल धांडे,विनोद टाकरळेडे, सुरेंद्र बाभरे, पंकज खडसे, नामदेव हटवार यांसह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.