spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान शहरात पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद

– ९३ टक्के बालकांना पोलिओ डोज. 

कन्हान :- नगरपरिषद व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेचा शुभारंभ नवनियुक्त आमदार डॉ राजीव पोतदार यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला.

कन्हान आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातील एकुण ४७ बुथवर ट्रॉझिंट चंमु ६ च्या मदतीने एकुण ४,७०२ बालकांपैकी ४,३५२ बालकांना पोलिओ प्रति बंधक डोस देण्यात आला. त्यामुळे सुमारे ९३ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या मोहिमेत पारशिवनी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. आशिर्वाद नागपुरकर, कन्हान वैद्यकीय अधिकारी डॉ. आकांशा कानफाडे, डॉ. वैष्णवी जगताप, डॉ. आयुषी डंभारे तसेच आरोग्य सहाय्यक हंसराज ढोक, सुनिल गायकवाड, आरोग्य सहाय्यिका संगिता का़ळबांडे, बंड, देशभ्रतार, सोनोणे, सांगोडे, गौरव भोयर, चेतन सहारे, पराते, चौधरी, गांजवे, इंगळे आदी सह आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांनीही आपल्या पाल्यांना पोलिओचे दोन थेंब पाजुन मोहिमेला भरघोस प्रति साद दिला. आरोग्य विभागाने उर्वरित पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले असुन ‘पोलिओमुक्त भारत’ अभियान यशस्विकरण्यासाठी सर्व पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

Popular Articles