कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील कुंभारे कॉलोनी येथे घरगुती वादातून गळफास घेण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतक गणेश जगलाल तुरकर (वय 48, रा. कुंभारे कॉलोनी, कामठी) यांनी 24 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास पत्नीसोबत झालेल्या घरगुती वादानंतर घरासमोरील झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना खाली उतरवून उपचारासाठी नागपूर येथील मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 28 जून रोजी सकाळी 9.15 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत्यूचे नेमके कारण व इतर बाबींचा पुढील तपास सुरू आहे.




