spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विभागातील सर्व जिल्ह्यात समाधानकारक पाऊस

· सरासरी 165 .45 मिमी पावसाची नोंद

· पेरण्यांना सुरुवात

· 27 टक्के पेरण्या पूर्ण

नागपूर :- विभागात मागील तीन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली असून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपच्या पेरणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत सत्तावीस टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

अल- निनो मुळे यावर्षी अनियमित व अपुरा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. विभागात जून महिना कोरडा पडल्यानंतर मागील तीन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. विभागातील सर्वच तालुक्यात पाऊस पडत असल्यामुळे खरीपच्या पेरणीला गती मिळाली आहे. नागपूर विभागात सरासरी 27 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. नागपूर विभागात खरीप हंगामामध्ये सरासरी 18 लाख 95 हजार 910 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्यापैकी आतापर्यंत 5 लाख 16 हजार 658 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. त्यापैकी आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 40 टक्के, वर्धा जिल्ह्यात 45 टक्के तर नागपूर जिल्ह्यात 29 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

विभागात सरासरी 165.7 मि मी पावसाची नोंद

नागपूर विभागात मागील तीन दिवसापासून पावसाला सुरुवात झाली आहे. विभागात आतापर्यंत 165 .7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विभागात जिल्हा निहाय पडलेल्या पावसामध्ये वर्धा जिल्ह्यात 194.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक आर्वी तालुक्यात 264.3 मिलिमीटर कारंजा 256.4 मिलिमीटर आष्टी 276 मिलिमीटर वर्धा 184.4 मिलिमीटर सेलू 164.5 मिलिमीटर,देवळी 201.4 मिली मीटर,हिंगणघाट 134.5 मिलिमीटर तर समुद्रपूर तालुक्यात 156.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत 171.4 मिलिमीटर म्हणजेच 87. 54 टक्के पाऊस पडला आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत पडलेल्या सरासरी पावसामध्ये सर्वाधिक पाऊस रामटेक तालुक्यात 238.1 मिलिमीटर, पारशिवनी 226.9 मिलिमीटर, काटोल 229.1 मिलिमीटर, नरखेड 210.3 मिलिमीटर, कळमेश्वर 235.2, मिलिमीटर नागपूर शहरात 135.1 मिलिमीटर, नागपूर ग्रामीण 156.2 मिलीमीटर, कामठी 162.2 मिलीमीटर, हिंगणा 156.8 मिलिमीटर, उमरेड 151 किलोमीटर, भिवापूर 116.9 मिलिमीटर तर कुही तालुक्यात 102.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.भंडारा जिल्ह्यात 115 मिलिमीटर, गोंदिया जिल्ह्यात 188.7 मिलिमीटर, चंद्रपूर जिल्ह्यात 156.5 मिलिमीटर,गडचिरोली जिल्ह्यात 165.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.