spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

उच्च शिक्षित तरुणीचा आयटीआयकडे कल; संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ

नागपूर :- संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रियेला आज उत्साहात प्रारंभ झाला. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवीधारक श्लेषा वंजारी हिने बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मेसन या व्यवसायात प्रवेश घेतल्याने संस्थेत तिचे विशेष कौतुक करण्यात आले. उच्च शिक्षण पूर्ण करूनही कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व ओळखत श्लेषा वंजारी हिने आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. बदलत्या रोजगाराच्या संधी लक्षात घेता कौशल्य विकासाला प्राधान्य देणाऱ्या तरुणाईसाठी तिचा निर्णय प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मेसन या व्यवसायात सर्वप्रथम प्रवेश घेतल्याबद्दल संस्थेच्या उपसंचालक श्वेता कुलकर्णी यांच्या हस्ते श्लेषा वंजारी यांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटनिर्देशक जयंत टाळटुले, अविनाश केने, सिद्धार्थ मेहरे, बांदरे, फाळके, व्यवसाय निदेशक इंद्रभूषण बेलसरे, प्रभाकर मुंडे तसेच संस्थेतील इतर निदेशक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उच्च शिक्षित तरुण – तरुणी आयटीआयच्या कौशल्याधारित अभ्यासक्रमांकडे आकर्षित होत असून रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत असल्याचे आशादायक चित्र यानिमित्ताने दिसून आले. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मेसन व्यवसायात प्रथम प्रवेश घेतल्याबद्दल श्लेषा वंजारी हिचा उपसंचालक श्वेता कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटनिर्देशक जयंत टाळटुले, सिद्धार्थ मेहरे, बांदरे,फाळके, व्यवसाय निदेशक इंद्रभूषण बेलसरे, प्रभाकर मुंडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या संदर्भातील माहिती सहदेव चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Popular Articles