spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आरटीई प्रतिपूर्ती ₹३५ हजार करण्यासह विविध मागण्यांसाठी ७ जुलैला पुण्यात आंदोलन

नागपूर/पुणे :- आरटीई (२५ टक्के प्रवेश) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रतिपूर्तीची सुमारे ₹३,००० कोटींची रक्कम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने राज्यातील विनाअनुदानित शाळांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर आरटीई फाऊंडेशन इंडियाच्या वतीने मंगळवार, दि. ७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शिक्षण संचालक तथा शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी दिली. आंदोलनात प्रति विद्यार्थी आरटीई प्रतिपूर्ती ₹३५ हजार करणे, प्रलंबित ₹३,००० कोटींची रक्कम तातडीने वितरित करणे, प्रतिपूर्तीमध्ये नियमित वाढ, पारदर्शक कार्यपद्धती, बोगस प्रवेशांवर कारवाई, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके, खासगी शिक्षकांना कॅशलेस मेडिक्लेम तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासह विविध मागण्या करण्यात येणार आहेत. या आंदोलनात राज्यभरातील शाळा संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. सचिन काळबांडे यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.