spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही… – तुकाराम मुंढे

मुंबई :- सध्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची संपूर्ण राज्यासह देशभर चर्चा आहे. राज्यभरात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसालाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबवत आहे. अन्न व औषध प्रशासनानेचे आयुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडाकेबाज कारवायांनी अन्न माफियांवर मोठा आळा बसला आहे. याचदरम्यान, तुकाराम मुंढेंनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली. यामध्ये माझ्या सततच्या बदल्यामुळे माझ्या मुलाचे मित्र झाले नाहीत. परंतु मला गोष्टीवरुन सहानभुती नकोय, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?  

मुलाच्या बाबतीत असं झालं की, पाचवीपर्यंत त्याच्या 6 शाळा बदलल्या गेल्या. कारण माझ्या बदलीमुळे त्याची दरवर्षी शाळा बदलायची. म्हणजे ती अगदी सुरुवात मुंबईपासून झाली, मग सोलापूर, मग नवी मुंबई, पुणे, नाशिक, परत मुंबई. हा प्रवास त्याला करावा लागला. आणि एका ठिकाणी एकापेक्षा जास्त वर्षं कधी त्याला भेटले नाहीत. मग इथं आल्यानंतर मात्र त्याला एकाच शाळेत ठेवलं. तेव्हापासून मुलगा थोडा स्थिरावला. पण मित्रपरिवार हा त्याला कधी वाढवता आला नाही. त्याचा परिणाम ‘माझे मित्र नाहीत’, असं तो बोलला. त्यामुळे माझी बदली ज्यावेळेस होते, त्यावेळेस मुलाचा प्रश्न असा असतो की, आता तुमच्याबरोबर मला यायचंय का? परत माझी शाळा बदलायची आहे का? आणि त्यावेळेस ही कठीण परिस्थिती असते. परंतु त्याला तोंड द्यावं लागतं. कारण जर भूमिका तुमची आहे, भूमिका तुम्ही घेतलेली आहे, एक रोल घेतलेला आहे आणि पब्लिक सर्व्हंट म्हणून तो जर आपल्याला तडीस न्यायचा आहे तर ते माझं दायित्व आहे. त्यामुळे मला गोष्टीवरुन सहानभुती नकोय, असं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.

Popular Articles