spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बच्चू कडू यांच्या 56 वाढदिवसानिमित्त 56 फळ झाडांचे वृक्षारोपण, वाचनालाय ई-लर्निंग सेंटरचे शुभारंभ, विविध उपक्रम

तिरोडा :- प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, विधानपरिषद सदस्य तथा माजी. राज्यमंत्री बच्चू कडु यांच्या 56 व्या वाढदिवसा निमित्त प्रहार संघटनेतर्फे 56 फळझाडांचे दिव्यांगांना वाटप, व शेतकऱ्यांच्या शेतावर वृक्षारोपण करुन झाडेलावा झाडे जगवा चे संदेश देण्यात आला. तसेच स्व. इंदिराबाई बाबाराव कडू, स्व. महादेव परसराम हरडे, स्व. महादेव हानाजी भांडारकर, यांच्या स्मुर्तीत वाचनालाय ई-लर्निंग सेंटरचे शुभारंभ सविता बेदरकर यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले. भव्य रक्तदान शिबीर, अनाथाचे नाथ सविता बेदरकर यांचे मोलाचे मार्गदर्शन, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा, शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ, सकाळच्या वेळी गुरुदेव सेवा भजन मंडळ नवेझरी तर्फे शिव मंदिर, हनुमान मंदिर येथे पूजा अर्चना व भजन गायन करण्यात आले. नागरिकांसाठी भोजनदान इत्यादी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अनाथाचे नाथ सविता बेदरकर, शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती लिल्हारे, पंचायत समिती सदस्य वनिता जागेश्वर भांडारकर, ग्रामपंचायत सितेपारचे सरपंच जनी कुंभरे, सामाजिक कार्यकर्त्या भेंडारकर नवेझरीचे पोलीस पाटील प्रकाश भांडारकर, सोनेखारीचे पोलीस पाटील अनमोल इळपाते, प्रहारचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बावनकर, संघटक बिसेन जिल्हासचिव महेंद्र नंदागवळी, गावातील जेष्ठ नागरिक, शेतकरी, दिव्यांग बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रहार संघटनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हासचिव महेंद्र नंदागवळी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रहारचे मीडिया प्रमुख नरेंद्र वासनिक, यांनी केले, सदर कार्यक्रमात उरकुडा उके, गोपाळ शेंडे, रतन खुरसिंगे, समस्त कार्यकर्ते, शेतकरी बांधव यांनी सहकार्य केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.