spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणेच्या विद्यार्थ्याकडून कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र-अभ्यास विषयावर मार्गदर्शन

तिरोडा :-  शाहिद मिश्रा हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, तिरोडा येथे माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) व यंत्र-अभ्यास (Machine Learning – ML) या विषयांवर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या सत्रात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे येथील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी अथर्व संदीप व्यास यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्र-अभ्यास, विविध कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने, त्यांचा दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच भविष्यातील शैक्षणिक व करिअरच्या संधी यांविषयी अतिशय सोप्या, प्रभावी आणि समजण्यास सुलभ पद्धतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी या सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रश्न विचारले आणि आधुनिक तंत्रज्ञानाबाबत अधिक जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली.

या उपक्रमाचे शंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र झरारिया, उपाध्यक्ष संजीव कोलते तसेच सचिव उमाशंकर हरोडे यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी प्राचार्य निकेशकुमार मिश्रा, उपमुख्याध्यापिका . भाजीपाले, सुपरवायझर टी. डी. पटले, बोकडे तसेच वरिष्ठ शिक्षक तारेंद्र रहांगडाले यांनीही अथर्व संदीप व्यास यांच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय विज्ञान शिक्षिका गायत्री संदीप व्यास यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. त्यांच्या नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वी व सुरळीतपणे पार पडला.

विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण करून त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्र-अभ्यास यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांची ओळख करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी व उपयुक्त ठरला. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.