नागपूर :- येत्या १३ जुलै रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येत असतो.
यावेळी विभागीय आयुक्त जनतेच्या तक्रारी, अडचणी, गाऱ्हाणी ऐकणार आहेत. संबंधितांनी जिल्हा स्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची प्रत, टोकनची प्रत तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या उत्तराची प्रत, या सर्व प्रतींच्या दोन संचासह उपस्थित राहावे. निवेदन देण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहील, असे नागपूर विभागाचे अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) प्रदीप कुलकर्णी यांनी कळविले आहे.




