spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वृक्षारोपणाने लाखनी येथील वाघाये महाविद्यालयात ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा

लाखनी प्रतिनिधी :- येथील स्थानिक स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘जागतिक लोकसंख्या दिना’चे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आणि कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला लक्ष्मी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष नरेंद्रभाऊ वाघाये पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करून करण्यात आली. यावेळी कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी स्वतः वृक्षारोपण करत उपस्थितांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले.

आपल्या मार्गदर्शनात डॉ. कापसे म्हणाले की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,” या राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगाप्रमाणे वृक्ष हे आपले सोयरे आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या काळात निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. नरेंद्रभाऊ वाघाये पाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. पुण्यशिल टेंभुर्णे, डॉ. सुधीर सहारे, डॉ. अनुराधा खाडे, डॉ. योगेश करवाडे, प्रा. प्रमोद भोयर यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

Popular Articles