spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ३७ प्रकरणांची नोंद उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई 

 

नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. गुरुवार (ता.३१)  रोजी शोध पथकाने ३७ प्रकरणांची नोंद करून ५६,४००/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड)  या अंतर्गत १७ प्रकरणांची नोंद करून ६,८00/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. १००/- दंड) या अंतर्गत ०४ प्रकरणांची नोंद करून ४००/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू.400/-दंड) या अंतर्गत ०२ प्रकरणांची नोंद करून ८००/- रूपयांची वसुली करण्यात आली.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हिस  प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत ०३ प्रकरणांची नोंद करून ६,०००/-रुपयांची वसुली करण्यात आली.वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत ०६ प्रकरणांची नोंद करून ३४,०००/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास १७ प्रकरणांची नोंद करून ३,४००/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ०५ प्रकरणांची नोंद करून रु.५,००० /- चे दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे.एस आर एस कंस्ट्रक्शन्स व मे.वृंदावन  कंस्ट्रक्शन्स यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रू.१०,०००/- या प्रमाणे रू.२०,०००/-चे दंड वसूल करण्यात आले.धरमपेठ झोन अंतर्गत मे. संतोष पकोडेवाला यांनी चेंबर ब्लॉक्‍ केल्यामुळे रू.5,000/- चे दंड वसुल करण्ययात आले.हनुमान नगर झोन अंतर्गत मे.ए+ कॉनव्हेंट   यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. चंद्रभागा डेअरी यांनी  प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धंतोली झोन अंतर्गत मे. तक्षय एलाईट यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. लकडगंज झोन अंतर्गत संकेत जंगटीवार यांनी फुटपाथ खराब केल्यामुळे रू.20,000/- दंड वसुल करण्यात आले.

मंगळवारी झोन अंतर्गत मे.चेलवानी ब्रदर्स यांनी बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू.10,000/- रूपयांची वसुली करण्यात आली. तसेच मे.मल्लिका फॅशन्स अँड लाईफस्टाइल एक्झीबिशन यांनी विनापरवानगी विद्युत खांबावर जाहिरातीचे फलक लावल्याने  रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 09 प्रकरणांची नोंद करून रू. 75,000/- दंड वसूल केला.

Popular Articles