spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कृषी आयुक्ताची कन्हान ॲग्रो शेतकरी कंपनीला भेट

 
कन्हान १ : –  जवळच असलेल्या तारसा रोड ते सालवा -एंसबा रोडवर निलज शेत शिवारातील कन्हान ऍग्रो व्हिजन शेतकरी कंपनीला महाराष्ट्र राज्याचे कृषी आयु क्त  सुरज मांढरे साहेब विभागीय संचालक, जिल्हा कृषी अधिकारी रविंद्र मनोहरे, आत्मा संचालक, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सह कृषी अधिका-यांनी भेट देऊन शेती विषयी समस्या, अडचणी तसेच कमी वेळात चांगल्या दर्जाचे पीक उत्पन्न घेण्याकरिता यांत्रिकीकरण पद्धती चा वापर करण्यावर भर देऊन प्रात्यासिका व्दारे मार्ग दर्शन करण्यात आले.
            महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त  सुरज मांढरे, विभागीय संचालक उमेश घाडगे साहेब जिल्हा कृषी अधिकारी  रविंद्र मनोहरे, आत्मा संचालक डॉ. अर्चना कडु, उपविभागीय कृषी अधिकारी  ग्रीष्मा डेहाने, तालुका कृषी अधिकारी राकेश वसु, कृषी सहाय्यक सचिन शिंदे सह समस्त कृषी विभागाचे अधिकारी हयांनी कन्हान ऍग्रोव्हिजन शेतकरी कंपनीला भेट देऊन एफपीओ च्या अडचणी, जास्त किमतीचे वान लाऊन शेतकऱ्यां चे उत्पन्न कश्या पद्धतीने दुपट्ट करता येईल. याकरिता काय अडचणी येतात. हया करिता सर्व कृषी विभाग यांना लक्ष केंद्रित करून मदत करण्यास सांगितले. तसेच मजुरांचा तुटवडा, वेळ व लागणारा जास्त खर्चा ची बचत कशी करता येईल याकरिता यांत्रिकीकरण पद्धतीचा वापर करण्यावर भर देऊन आर.टी.पी मशी नचा वापर करून धान प्रात्यक्षिक घेण्यात आले. कार्य क्रमाचे संचालन सचिन शिंदे हयांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने संचालक व शेतकरी बांधव उपस्थित होते. याप्रसंगी कन्हान ऍग्रोव्हिजन शेतकरी कंपनीचे संचालक कमलेश भोयर, संचालक राजेंद्र बंड, संचाल क अभिजित फरसोले, संचालक संदीप कडु, संचालक मंगलाताई भोयर, संचालक मीराताई भोयर, संचालक श्रद्धा कडु, सोनाली फरसोले, संकेत आमटे, रविभाऊ गजभिये, धनराज हारोडे, रमेश चकोले, डोमा जी चकोले, सचिन चकोले, अजय मांढरे, मोरेश्वर फुटाणे, राकेश चकोले, सोमाजी भूते, गुंडेराव भूते, वंश पाहुणे, आशिष ठाकरे, राकेश चकोले, गणेश भक्ते, राजुभाऊ चकोले, सुभाष पाहुणे, अंकुश कारेमोरे, जगदीश कारेमोरे, ज्ञानेश्वर वंजारी सह बहुसंख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Popular Articles