– ट्रॉमा सेंटर सह अत्याधुनिक सुविधां तातडीने उपलब्ध करा
– कन्हान शहर विकास मंच पदाधिऱ्यांचे आमदार डॉ राजीव पोतदार यांना निवेदन
कन्हान :- प्राथमिक आरोग्य केंद्राला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात यावे तसेच आधुनिक वैद्य कीय सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी कन्हान शहर विकास मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी नागपुर विधान परिषदेचे आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी प्रथमच कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली असता, कन्हान शहर विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्रासह परिसरातील सुमारे ४० गावांतील नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे आमदारांचे लक्ष वेधण्यात आले. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. औषधां चा तुटवडा, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता, आवश्यक वैद्य कीय उपचारांचा अभाव, रुग्णालयातील अपुरी स्वच्छ ता, रुग्णवाहिका चालकांची कमतरता तसेच आपत्का लीन रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नागपुर किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असुन आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
कन्हान हे पारशिवनी तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर असुन परिसरातील ४० गावांची प्रमुख बाजारपेठ आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमां क ४४, रेल्वे जंक्शन, औद्योगिक क्षेत्र आणि कोळसा खाणींमुळे येथे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ अस ते. मात्र आजही सामान्य प्रसुती, शस्त्रक्रिया, बालरोग उपचार, तज्ज्ञ डॉक्टर आणि आपत्कालीन सेवांसाठी नागरिकांना नागपुर गाठावे लागते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर वारंवार गंभीर अपघात घडत असल्या ने कन्हान येथे अत्याधुनिक ट्रॉमा सेंटरची नितांत गरज असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. ट्रॉमा सेंटर, तज्ज्ञ डॉक्टर आणि आवश्यक वैद्यकीय यंत्रणा नसल्या मुळे गंभीर जख्मींना २० ते ३० किलोमीटर दूर नागपुर ला हलवावे लागते. अनेक रुग्णांचा ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यु होण्याच्या घटना घडत असल्याने तातडीने ट्रॉमा सेंटर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय डिजिटल एक्स-रे, सोनोग्रा फी, सीटी स्कॅन, ईसीजी, पॅथॉलॉजी लॅब, आयसीयु, नवजात शिशु कक्ष (NICU), प्रसुती कक्ष, ऑपरेशन थिएटर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन प्लांट, रक्तसाठा केंद्र, डायलिसिस युनिट आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी ही करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा शक्य नसल्याचे आमदारांचे मत
आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी कामठी येथे आधीपासुनच उपजिल्हा रुग्णालय कार्यरत असल्याने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राला उपजिल्हा रुग्णाल याचा दर्जा मिळणे सध्या शक्य नसल्याचे मत व्यक्त केले. मात्र कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था वाढविणे, अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून देणे तसेच आवश्यक आरो ग्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न कर ण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले. आता आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी किती लवकर होते, याकडे कन्हानसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देतांना कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे, नारायण गजभिये, प्रमोद गिऱ्हे, शुभम बावन कर, आयुष संतापे, सुषमा मस्के सह नागरिक उपस्थित होते.



