spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ज्येष्ठ नागरिकांनी 31 जुलै पर्यंत स्मार्ट कार्ड नोंदणी करून घ्यावे – सुषमा पारधी

हंसराज,भंडारा सिहोरा :-  ज्येष्ठ नागरिकांनी एसटी बस प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेले स्मार्ट कार्ड जवळच्या केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावे असे आवाहन सुषमा पारधी जिल्हा परिषद सदस्य सिहोरा क्षेत्र यांनी केले आहे.ज्येष्ठ नागरिकांची एसटी बस प्रवास सवलत येत्या 1 ऑगस्ट पासून बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे. स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी तुमसर हे मुख्य केंद्र आहे. ज्यांनी स्मार्ट कार्ड नोंदणी केली नसेल त्यांनी तुमसर बस स्थानक, चुल्हाड व सिहोरा येथे बँक ऑफ इंडिया लगत असलेल्या केंद्रावर जाऊन नोंदणी करून घ्यावे.

सिहोरा व परिसरातील सुमारे 30 ते 35 खेड्यातील 65 वर्षावरील नागरिकांना या केंद्रामुळे मोठा फायदा होणार आहे.विशेषता महिलांना या प्रवास सवलतीचा लाभ सहज मिळणार असून वयोवृद्धांचा वेळ व श्रम वाचणार असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.1 ऑगस्ट पासून आधार कार्ड वरील एसटी बस सवलत बंद होणार असल्याचे सांगितले जात असून 31 जुलै ही शेवटची तारीख असल्याचे उल्लेखित आहे.

स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यासाठी सिहोरा व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना 22 ते 30 किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. ज्येष्ठ नागरिकांच्या मागणी प्रमाणे स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी काही ठिकाणी केंद्र उभारण्यात आले आहेत त्यात सिहोरा व चुल्हाड या केंद्रावर सुद्धा नोंदणी होत असल्यामुळे वेळ व पैशाची बचत फायदेशीर ठरली आहे.तरी ज्येष्ठ नागरिक व विशेषता महिलांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सुषमा पारधी यांनी केले आहे.

आगार व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली असता स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. तुमसर तालुक्यात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी 4 ते 5 ठिकाणी केंद्र सुरू आहेत. तुमसर तालुक्यात महिला आणी पुरुष मिळून 10 हजारच्या घरात स्मार्ट कार्डची नोंदणी झालेली आहे.काही ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्ट कार्ड तयार झाल्यानंतरही त्याचा वापर करीत नाही.आधार कार्ड वरच सवलत घेत आहेत. आधार कार्ड वरील सवलत 1 ऑगस्ट पासून बंद होणार असल्याची चर्चा असली तरी स्पष्ट आदेश नाहीत.पुढील आदेशापर्यंत मात्र स्मार्ट कार्ड नोंदणी सुरूच राहील असे आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांनी सांगितले.

– जि. प. सदस्या सुषमा पारधी


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.