कन्हान १ : – शहरातील एसबीआई एटीएम मध्ये दोन अनोळखी तरुणांनी एटीएम कार्डची अदला बदल करुन राज राजाराम यांच्या बैंक खात्यातुन ७२,८०० रुपये काढुन फसवणुक केल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रविवार (दि.२७) जुलै ला राज किशोर राजाराम पाल (५५) रा. कामठी कॉलरी खदान हे हनुमान नगर कन्हान येथील एसबीआय शाखेच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेले. एटीएम च्या बाहेर दोन अनोळखी तरुण उभे होते. राज यांनी एटीएम च्या आत प्रवेश करुन एटीएम कार्ड मशीन मध्ये टाकले असता एक तरुण त्यांचा जवळ गेला आणि मशीनचे बटण दाबले व म्हटले की, मशीन मधुन पैसे निघत नाही आहे, मला तुमचे एटीएम दाखवा मी तुमच्या एटीएम मधुन पैसे काढतो आणि ते तुम्हाला देतो. राज ने एटीएम त्याला दिले, त्याने राज यांचे लक्ष विचलित करून एटीएम बदलविले व त्याचे कडे असलेले एटीएम राजला दिले . म्हणाला हे एटीएम मशीन मध्ये टाका आणि एटीएम पिन नंबर टाका. राज पैसे काढत असतांना तरुण त्यां च्या कडे पाहत होता. तरुणांनी पिन नंबर पाहिला आणि दोघे ही तेथुन पळुन गेले. एटीएम मधुन पैस निघत नसल्याने राज घरी गेला. त्याच दिवशी सायंका ळी राजला फोनवर खात्यातुन ७२,८०० रुपये काढ ल्याचे मॅसेज आला. अज्ञात तरुणांनी एटीएम बदलुन पिन नंबर माहित करुन घेत खात्यातुन ७२,८०० रुपये काढुन फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी राज राजाराम यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.







