spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर ग्रामीण येथे सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा सत्कार समारंभ  

 

नागपूर  १ : नागपूर ग्रामीण पोलीस दलाकडून सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा गौरव करण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस भवन येथे ३१ जुलै रोजी एक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभात नागपूर जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या हस्ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या नऊ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा त्यांच्या पोलीस दलात अनेक वर्षे बजावलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक सतीश रणजितसिंह राजपूत (एमआयडीसी), पोलीस उपनिरीक्षक नरेश जयदेवजी रामटेके (उमरेड), नीलिमा अतुलराव नलोडे (बेला), श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सदाशिव केशवराव काटे (वेलतुर), सुरेश रायबांजी धवराळ (उमरेड), जयेंद्र बाबुराव शिर्के (खापा), तसेच सहायक फौजदार विठ्ठल नानाजी वंजारी (खापरखेडा), खुशाल वसंत रामटेके (पोलीस मुख्यालय, नागपूर ग्रामीण) आणि अनिल गुलाबराव बगमारे (पारशिवनी) यांचा समावेश होता. या सन्मान सोहळ्यात बोलताना अनिल म्हस्के यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला गृह मानव संसाधन शाखेचे पोलीस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी तसेच इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.