spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुटीबोरी पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी: मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड, एका आरोपीला अटक

 

नागपूर १ : बुटीबोरी पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या एका गुन्ह्याचा यशस्वी तपास करत, एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे चोरीला गेलेली मोटार सायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.

ही घटना १८ जुलै, २०२५ रोजी घडली होती. फिर्यादी निखिल धोंडू राहांगडाले (वय ३२, रा. सातगाव, रिधोरा) यांनी आपली बजाज प्लॅटिना मोटार सायकल (क्र. एमएच ३५ झेड ४१९४) बुटीबोरी येथील एमआयडीसी चौकात, तिरुपती वाईन शॉपसमोर उभी केली होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास ही गाडी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. या तक्रारीवरून बुटीबोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (अ.क्र. ६९१/२०२५) नोंदवण्यात आला.

बुटीबोरी पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू केला. गुप्त माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी ३० जुलै, २०२५ रोजी आरोपी चंद्रकांत उर्फ शेखर शंकर कुटारकर (वय २५, रा. गव्हा, जि. वर्धा) याला अटक केली. विशेष म्हणजे, याच आरोपीला २५ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात (अ.क्र. ५२५/२०२५) अटक करण्यात आली होती.

पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपीचा ताबा घेऊन त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटार सायकल (क्र. एमएच ३५ झेड ४१९४) जप्त केली आहे असून पुढील तपास सुरू आहे

Popular Articles