spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर ग्रामीणमध्ये पोलीस पाटलांची बैठक; आगामी सणांमध्ये शांतता राखण्याचे आवाहन

नागपूर १ : नागपूर ग्रामीण जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रामटेक उपविभागातील पोलीस पाटलांची एक महत्त्वाची बैठक ३१ जुलै, २०२५ रोजी पोलीस भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आगामी सण आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीला उपस्थित असलेल्या २०० ते २५० पोलीस पाटलांना नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी संबोधित केले. त्यांनी जन्माष्टमी, गोपाळकाला, पोळा, गणेश चतुर्थी (स्थापना) आणि अनंत चतुर्दशी (विसर्जन) यांसारख्या आगामी सण-उत्सवांमध्ये तसेच निवडणुकांमध्ये गावात शांतता राखण्याचे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.

याशिवाय, गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, महिला आणि बालकांच्या सुरक्षेबाबत दक्षता घेणे, तसेच गावातील अवैध धंद्यांवर आळा घालणे यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी पोलीस पाटलांना मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या.

या बैठकीत रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनीही उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.

Popular Articles