पालघर येथील उबाठाचे माजी नगरसेवक पिंपळे यांच्यासह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी भाजपात दाखल

0
22

– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

मुंबई :- पालघरचे उबाठा गटाचे माजी नगरसेवक प्रथमेश पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामपंचायतींच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, आ. हरिश्चंद्र भोये, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन, वसई – विरारचे नगरसेवक अशोक शेळके आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष  चव्हाण म्हणाले, भाजपा हा जातीव्यवस्थेच्या बाहेर जाऊन समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले जात आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज आणि वीज बिल माफीने कृषी क्षेत्रातही सकारात्मक परिणाम होणार आहे. भाजपावर विश्वास ठेऊन आलेल्या या पदाधिकाऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही, असे चव्हाण यांनी सांगितले.

पालघर नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार ॲड. रवींद्र गडग, हेमांगी भगत, पालघर वाहतूक सेनेचे माजी शहराध्यक्ष सचिन राऊत, माजी युवा सेना शहर प्रमुख सतीश शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पालघर शहर सचिव विशाल पवार, बहुजन विकास आघाडीचे रविंद्र पिंपळे, पुष्पक पाटील, केतन मोरे तसेच अनेक ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य आणि कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.