कामठी १ : तालुक्यातील येरखेडा नगरपंचायत कार्यालयात पंतप्रधान आवास योजने विषयी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान आवास योजना दोन, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना मेळाव्याचे उद्घाटन येरखेडा नगरपंचायत चे प्रशासक अमर हाडा यांचे हस्ते दीप प्रज्वलन व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करू करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार सारिका धात्रक, मंडळ अधिकारी मोहित मेश्राम, अभियंता लीना कळंबे, समन्वयक सुशील धांडे, योगेश झुनझुनवाला, प्रवीण आगाशे उपस्थित होते मेळाव्यात प्रशासक अमर हाडा यांनी पंतप्रधान आवास योजना दोन चे विषयी नागरिकांना माहिती देऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आव्हान केले ,पंतप्रधान आवास योजने संबंधित नागरिकांना काही अडचणी आल्यास त्यांनी नगरपंचायत कार्यालय येरखेडा येथील येऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आव्हान सुद्धा केले आहे.








