spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ग्राम पंचायत व नगर पंचायतच्या गोंधळात बारा अंगणवाड्यांमधील विद्युत पुरवठा खंडित

तीन दिवस राहिला विद्युत खंडित

कामठी, ता. १ : शहरालगतच्या येरखेडा ग्राम पंचायतला काही महिन्यापूर्वी नगर पंचायतचा दर्जा मिळाल्याने गोंधळामुळे नगर पंचायतच्या हद्दीतील १२ आंगणवाड्यातील मीटरचे बिल न भरल्यामुळे विद्युत विभागाने थेट तीन दिवसापूर्वी विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
येरखेड्यात एकूण बारा आंगणवाड्या आहेत ग्राम पंचायत असताना या आंगणवाड्याच्या मीटरचे बिल पंचायत समिती कडून भरण्यात येत होते. याबाबत माहिती अभावी नगर पंचायत झाल्यानंतर हे आंगणवाड्यातील मीटरचे बिल स्वतः नगर पंचायतला भरावयाचे होते परंतु याबाबत संबधितांना पूर्णपणे माहिती नसल्याने विद्युत विभागाला विद्युत पुरवठाच खंडित करावे लागले. यामुळे अंगणवाड्यांमध्ये दिवा, पंखे व इतर विद्युत सुविधांचा अभाव निर्माण झाला असून लहान बालकांना व कार्यकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश दहाट यांना अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून मागील तीन दिवसांपासून अंगणवाडी केंद्रात लाईट नसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी परिसरातील लाईनमन यांना विचारणा केली असता साहेबांच्या आदेशानुसार लाईन कापल्याचे सांगितले. नगर पंचायतशी सम्पर्क केला असता समजण्यात गोंधळ झाला असल्याचे सांगण्यात आले. प्रशासकांना भ्रमन दूरध्वनीवर सम्पर्क केलाअसता याबाबत सूचना नसल्याचे सांगण्यात आले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी वीज बिल भरण्याची नोटीस देऊनही नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. विजेअभावी पोषण आहार तयार करणे, पाणीपुरवठा व मुलांचे दैनंदिन उपक्रम यावर परिणाम होत आहे. येरखेडा विद्युत वितरण केंद्रात सम्पर्क केला असल्यास येथील जुनिअर इंजिनअर तांडेकर यांनी हा विषय संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. नगर पंचायत प्रशासक अमर हांडा व माजी सरपंच मनीष कारेमोरे, ग्रामपंचायत सदस्य सतीश दहाट यांनी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून वीजपुरवठा पूर्ववत करावा व बालकल्याणाच्या दृष्टीने गांभीर्याने पावले उचलावी, अशी मागणी करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.