spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषि दिन कार्यक्रम उत्साहात साजरा

नागपूर :- जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नागपूर, प्रकल्प संचालक (आत्मा) नागपूर, कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नागपूर आणि पंचायत समिती नागपूर यांचे संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम बुधवार, दिनांक १ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शेतकरी प्रशिक्षण सभागृह, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय नागपूर येथे साजरा करण्यात आला . सदर कार्यक्रमास जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे , प्रकल्प संचालक आत्मा नागपूर अर्चना कडू , अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, नागपूर डॉ. कमलकिशोर फुटाणे, विद्यापीठातील शास्त्रज्ञ,कृषी विकास अधिकारी समाधान धुळधुळे , लोकप्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी, स्थानिक शेतकरी, पिकस्पर्धेचे शेतकरी, कृषि प्रक्रिया करणारे शेतकरी उद्योजक, कृषि क्षेत्रामध्ये विशेष योगदान देणा-या महिला शेतकरी , पाणी फाउनडेशन अंतर्गत कृषी सखी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अवच्चीत साधून पिक स्पर्धेत विजेते व प्रगतीशील शेतकर्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रस्ताविकामधे कृषी विकास अधिकारी समाधान धुळधुळे यांनी कै. वसंतराव नाईक यांचे जीवनपट व कृषी दिनाचे मह्त्व सर्व उपस्थिताना सांगितले. अर्चना कडू प्रकल्प संचालक आत्मा यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा व कृषी पुरस्काराचे जास्तीत जास्त प्रस्ताव सादर करण्यास शेतकर्यांना आवाहन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नागपूर रवींद्र मनोहरे यांनी अल निनो च्या प्रभावामुळे या खरिपामध्ये पाऊसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकर्यांनी पिकाचे नियोजन कृषी विभागाच्या सल्ल्या प्रमाणे करावे असे सांगितले. अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद, नागपूर डॉ. कमलकिशोर फुटाणे यांनी कृषीतील कै. वसंतराव नाईक यांचे योगदान , व कृषी ची पुढील दिशा यावर माहिती दिली .तसेच काही शेतकर्यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. विनोद खडसे, कृषि विस्तार विद्यावेत्ता, डॉ. राहुल वडसकर, सहायक प्राध्यापक, कीटक शास्त्र विभाग , कृषि महाविद्यालय, नागपूर यांनी शेतकर्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. तालुका नागपूर ग्रामीण येथील वलनी या गावामध्ये क्षेत्रीय स्तरावर वृक्षरोपण कार्यक्रम व कापूस पिकाचे सरी वरंभा लागवड प्रात्याषिक शेतकर्यांना करून दाखविण्यात आले . कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मंगेश पंदारे कृषी अधिकारी पंचायत समिती नागपूर यांनी केले .

Popular Articles