spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवरगाव जि.प.शाळेत कॉन्व्हेंटचे उद्घाटन

– अतिथींकडून उपक्रमाचे कौतुक  

बेला :- ग्रामस्थांच्या सहकार्याने जि.प.उच्च प्राथमिक शाळेत चिमुकल्यांना काळानुरूप शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने कॉन्व्हेंट सुरू करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी महेंद्र पारसे यांचे हस्ते सदर कॉन्व्हेंटचे उद्घाटन नुकतेच उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोशन गमे होते. याशिवाय पोलीस पाटील प्रशांत गमे,केंद्रप्रमुख प्रवीण शेंडे, शांताराम मोहरे जोगेश्वर घोडमारे व मुख्याध्यापिका प्रतिभा कनीरे प्रामुख्याने उपस्थित होते.

नर्सरी,केजी वन व केजी टू चे शिक्षण ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळेतच करून देण्याचे दृष्टीने शाळा व्यवस्थापन समिती,पालक व नागरिकांच्या सहकार्याने नाममात्र शुल्कात कॉन्व्हेंट सुरू केले. त्याबद्दल उपस्थित पाहुण्यांनी शाळेतील कार्यरत शिक्षकांचे आपल्या भाषणातून कौतुक केले. यावेळी प्रवेश घेतलेल्या ३ ते ६ वर्ष वयोगटातील बालकांचे पुष्प देऊन अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात आले. निवृत्तीच्या अखेरच्या वर्षात गेल्या दहा वर्षापासून पाहिलेले स्वप्न अखेर निवृत्तीच्या शेवटच्या वर्षात पूर्ण झाल्याचे समाधान वाटते. असे मनोगत मुख्याध्यापिका कनेरी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून व्यक्त केले.गटशिक्षणाधिकारी पारसे यांनी ग्रामीण गोरगरीब बालकांचे हित शिक्षकांनी जोपासावे. काळानुरूप तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून आधुनिक युगाच्या दिशेने पाऊल उचलावे व विविध उपक्रम यशस्वी करावे.असे आवाहन करून कॉन्व्हेंट चालवण्यासाठी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. उद्घाटनास शिक्षक प्रशांत भागवत, खेतापुर शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कातुरे ,सहायक शिक्षिका अनुपमा हुंगे,आशिष रंगारी, बाजीराव करारे, नागेश माहुरे,हर्षा माहुरे, शुभांगी गमे, नवनियुक्त बालसेविका तेजल घोडमारे, सुशांत करारे, रिंकेश शहाणे ,किशोर राखुंडे, कल्पना इंगोले, शांता दमके, पंकज शहाणे, शिवांशी इंगळे ,प्राची माहुरे ,पूजा माहुरे ,व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील सहाय्यक शिक्षक तुळशीराम हुंगे यांनी केले तर आभार इयत्ता सहावीतील विद्यार्थी क्रिश किसना निंबुळकर यांनी मानले.

Popular Articles