spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभा

– आमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा

नागपूर :- नागपूर विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने नागपूर विभागीय बोर्ड कार्यालयात ‘समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा’ या वि.मा.शि. संघाच्या उपक्रमाअंतर्गत ‘समस्या निवारण सभा’ २३ जुलै २०२६ रोजी पार पडली. या बैठकीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, परीक्षा केंद्र आणि मानधनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही सभा दुपारी २ ते ४.३० पर्यंत चालली.

सभेत उच्च माध्यमिक शाळातील – महाविद्यालयातील नवनियुक्त कनिष्ठ महाविद्यालय – उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची शालार्थ आयडी प्रकरणे, पेपर तपासणीचे व मॉडरेशनचे मानधन ज्या शिक्षकांना मिळाले नाही, त्या शिक्षकांना देण्यात यावे, परिक्षा केंद्रावर केंद्र संचालक, रनर, लिपीक, पर्यवेक्षक तर उत्तरपत्रिका तपासताना मुख्य नियामक, नियामक व परीक्षक चोखपणे पार पाडणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, त्याबाबत वरिष्ठांकडे मागणी करावी, रनर हा माध्यमिक शिक्षकच असावा, रनर बंद करून पूर्वीप्रमाणे अतिरिक्त संचालक नियुक्त करण्यात यावे, भरारी पथकामध्ये प्राथमिक शिक्षकांना घेण्यात येऊ नये, भरारी पथकाचे कार्य निश्चित करण्यात यावे, इयत्ता १० वी / १२ वीचे केंद्र देताना विद्यार्थ्यांच्या शाळेपासून फार लांब अंतर देण्यात येऊ नये, अश्या सूचना आमदार सुधाकर अडबाले यांनी बोर्ड अध्यक्षांना दिल्या. यासह इतर अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या विषयपत्रातील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात याव्या, अश्याही सूचना देण्यात आल्या. सभेला बोर्ड विभागीय अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे, सर्व शिक्षणाधिकारी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, नागपूर जिल्हाध्यक्ष (ग्रा.) अनिल गोतमारे, जिल्हा कार्यवाह संजय वारकर, नागपूर महानगर अध्यक्ष विठ्ठल जूनघरे, महानगर कार्यवाह अविनाश बढे, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगर अध्यक्ष शकील सर, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, विजय गोमकर, धनराज राऊत, अरुण कराळे, लक्ष्मीकांत व्होरा, शैलेश येडके, सचिन इंगोले, दिलीप बांबल, धनराज हुकरे, मुरलीधर काळमेघ, संजय वांगे व विमाशी संघ पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.