– केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते होणार लोकार्पण रविवारी
नागपूर :- ‘फील द बर्न फिटनेस’ च्या वर्धमान नगर येथील नव्या प्रीमियम शाखेची अधिकृत घोषणा आज आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आली. यावेळी संस्थापक आशीष जैस्वाल अभिषेक जैस्वाल यांनी नवीन शाखेची माहिती देत, रविवारी (दि. २६ जुलै) होणाऱ्या भव्य उद्घाटन सोहळ्याची रूपरेषा जाहीर केली ते म्हणाले की, वर्धमान नगर येथील मेहता पेट्रोल पंप वर्धमान नगर इमारतीच्या पहेलिया मजल्यावर साकारण्यात आलेल्या या अत्याधुनिक जिमचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते होणार असून, यावेळी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर निता ठाकरे, विशेष पाहुणे आमदार मोहन मते आमदार प्रविण दटके, आमदार कृपाल तुमाने, दयाशंकर तिवारी, विक्की कुकरेजा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील. सुमारे ७ हजार चौरस फूट क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या प्रीमियम फिटनेस सेंटरमध्ये अत्याधुनिक व्यायाम साहित्य, अनुभवी प्रशिक्षक, आइस बाथ, स्टीम रूम तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि लहान मुलांसाठीही विशेष प्रशिक्षण सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी माहिती पत्र परिषदेत देण्यात आली. या उद्घाटन सोहळ्यास नागपूरकर नागरिक, फिटनेसप्रेमी तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थापक आशीष जैस्वाल, अभिषेक जैस्वाल व व्यवस्थापक कुलदीप चिकाने यांनी केले. परिषदेला शुभांगी वानखेडे, मेरी लुईस, अमोल गीते, योगेश दोदेवार, अभिजीत यादव, रोहित मरस्कोल्हे, योगिता बरडे आणि दासू हुमणेवार यांची उपस्थिती होती.





