Home Latest News एस.एस.महात्मे संस्कार विहार शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी उत्साहात

एस.एस.महात्मे संस्कार विहार शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी उत्साहात

0
22

नागपूर :- एस.एस. महात्मे संस्कार विहार शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक दिंडीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांच्या भक्तीपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीभावाने दिंडी काढली. कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. दिंडीमुळे परिसरात आनंददायी व उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे संचालन सातवीतील अशिनी खोब्रागडे व शौर्य आंबिलहुके यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळेचे कौतुक केले.