spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आषाढ एकादशी निमित्त भाविकांनी केला विठ्ठल नामाचा जयघोष !

– दिंडी_चालली_पंढरी रामकृष्णहरी

आज आषाढी एकादशी निमित्त रवींद्र नगर येथील परिसरात श्री गणेश मंदिर समिती, च्या वतीने वारकरी भजन मंडळांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर विठ्ठल मय झाला. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, जय हरी विठ्ठल, राम कृष्ण हरी या नामस्मरणात अवघ पंढरपूर अवतरल्याचा आनंद मिळाला. याचे आयोजन श्रीपाद बोरीकर यांनी केले तर वारकरी दिंडीत आध्यात्मिक प्रकोष्ठचे डॉ श्रीरंग वराडपांडे, अनेक वारकरी भजनी मंडळ, श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाचा आषाढी एकादशी निमित्ताने आषाढ वारी दिंडी सोहळा विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातून भजनी मंडळ आणि वारकरी भाविकांच्या उपस्थितीत उत्साहत संपन्न झाला. दिंडीचे पूजन भाविकांच्या यांचे हस्ते करण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलभक्त वारकरी आणि भजनी मंडळासोबत नामस्मरण दिंडी काढण्यात आली. यात पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ,ज्ञानबा माऊली तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय आदींचा जयघोषाने परिसर विठ्ठल नामात दुमदुमला. वारीच्या माध्यमातून भाविकवृंद एकत्र येऊन उत्साहाच्या वातावरणात ज्याप्रमाणे एकता, समानता, निर्मळता अशा अनेक मूल्यांचे प्रदर्शन करतात याचा प्रत्यय आला. परिसरातील रस्ता विठ्ठल भक्तांनी सडे शिपडून, फुलांनी, रांगोळ्यांनी सुशोभित होता. दिंडीत घोष, टाळ मृदंग, भगवे ध्वज, पर्यावरण संवर्धनाची फलके इत्यादीच्या माध्यमातून वारीचे दृश्य साकारले. पालखीचे षोडशोपचार पूजन पौरोहित्याखाली विष्णु सहस्रनाम अभिषेक करण्यात आला. त्यानंतर हरीपाठ पठण करण्यात आला. विठ्ठल रखुमाई यांच्या फोटोचे मंत्र उपचाराने पूजन माल्यार्पण व महाआरती करून प्रसाद वितरण करण्यात आले. मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित दिंडीत सहभागी होते. कार्यक्रमाचा समारोप पसायदानांनी झाला.

Popular Articles