spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापरखेडा तेली ते पारडीखुर्द पर्यायी पूल वाहल्यामुळे बंद असलेली वाहतूक आज रविवार पासून सुरू होणार – सुपरवायझर शबीर मडावी 

किशोर साहू, मौदा :- तीन दिवसांपूर्वी सुरू असलेल्या सततधार पावसाने खापरखेडा तेली ते पारडीखुर्द दरम्यान नाल्यावरील पर्यायी पूल बुधवार ( ता.22 जुलै)ला वाहून गेलेला होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद होती. दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्याने संबंधित कंत्राटदाराने वाहलेला पर्यायी पूल दुरुस्त करण्यासाठी व जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे शेवटच्या टप्प्यावरील बांधकाम युद्ध स्तरावर सुरू केल्याने उद्या रविवार (ता.26 जुलै) सकाळपासून वाहतूक सुरू होणार असल्याचे आज शनिवार (ता.25 जुलै)ला संबंधित रस्त्याचे कंत्राटदाराचे सुपरवायझर शबीर मडावी यांनी दुपारी तीनच्या दरम्यान प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन विचारपूस केली असता सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.