spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कांद्री येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकरी संवाद मेळावा व उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा संपन्न

– स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त जनसेवा सप्ताह’ आणि वृक्षारोपण. 

कन्हान :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,नागपुर ग्रामीण अंत र्गत कन्हान-कांद्री शहराच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती महोत्सवाचे निमित्त आयोजित ‘जनसेवा सप्ताहाच्या’ चौथ्या दिवशी शनिवार (दि.२५) जुलै ला मारोतराव पानतावणे महाविद्यालय गहुहिवरा रोड कांद्री-कन्हान येथे शेतकरी संवाद मेळावा, उत्कृष्ट शेतकरी सत्कार सोहळा व वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साह पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपुर ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राजा टाकसाळे होते. प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे तसेच प्रदेश महा सचिव किशोर बेलसरे, रामटेक विधानसभा अध्यक्ष गणेश पानतावणे, न प कन्हान माजी उपाध्यक्ष डॉ. मनोहर पाठक, ज्येष्ठ पत्रकार एन.एस. मालविये आणि किरण झाडे यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ. राजा टाकसाळे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रपाल चौकसे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना, नागरिकांना मार्गदर्शन करित स्व. अजित दादा पवार यांच्या जीवनावर प्रकाश टाकत म्हणाले की राज्यातील शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक जनहितकारी निर्णय घेतले आहेत.

सिंचन, कृषी विकास, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगाराच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आणि दादांचे विकासाभिमुख विचार घरोघरी नेणे हीच आपल्या पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची खरी जबाबदारी आहे. यानंतर आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात शेतकऱ्यांच्या विविध समस्या, आधुनिक शेती तंत्रज्ञान, उत्पादन वाढ, बाजारपेठ आणि पाणी व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून हरित भविष्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमास परिसरातील शेती क्षेत्रात उल्लेखनिय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्का र करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संगीत भारती, जिल्हा महासचिव अशोक पाटील, पुराणदास तांडेकर, सुनील लाडेकर, श्रीराम नांदुरकर, शफीक शेख, सम्राट पगारे, राजेंद्र हटवार, मोरेश्वर सोनटक्के, रोहित मानवटकर, संदीप कभे, शशिकला बागडे, निशा ठाकरे, दीक्षा सोमकुवर, स्वाती पाठक, लक्ष्मी लाडेकर, कांचन मस्के, रेखा मस्के, मनिषा वासनिक, सुनिता मारबते, प्रभा चापले, रॉबिन निकोसे, रविंद्र केने, सतीश बेलसरे, सूर्यभान फरकाडे, शैलेश झेंडे, यशवंत भोरगे, ज्ञानेश्वर विघे, सोमाजी गिऱ्हे, अशोक इंगळे, नथुजी चरडे, देविदास जामदार, सुधाकर मेश्राम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कन्हान, कांद्री शहर सह अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.