spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निमखेडा येथील विश्रांती कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आषाढी एकादशी भक्तीभावाने आणि शिस्तीने साजरी

किशोर साहू, मौदा :- निमखेडा येथील विश्रांती कान्व्हेंट स्कुलमध्ये मध्ये आषाढी एकादशीचा सण मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या स्तोत्रांनी आणि अभंगांनी झाली. मुलांनी दिंडीचा वेश धारण करून शाळेच्या आवारात ‘ज्ञानबा तुकाराम’चा जप केला.

प्रार्थना सभेत, शिक्षकांनी आषाढी एकादशीचे महत्त्व समजावून सांगितले की ,हा दिवस भक्ती आणि समानता, सेवा आणि शिस्त यांचे प्रतीक आहे.

विठ्ठलाचा वेश धारण केलेल्या लहान मुलांपैकी काहींनी तुकारामांचे अभंग म्हटले. शेवटी, सर्व मुलांना तुळशीचा प्रसाद वाटण्यात आला.

याप्रसंगी मुख्याध्यापिका शांता खांडेकर, संचालिका बिंदू तगिरिसा, अध्यक्ष रक्षक खांडेकर म्हणाले की, “मुलांना आपली संस्कृती आणि संत परंपरेशी जोडणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकवृंद प्रियंका दोरखंडे, पल्लवी राऊत, वैभवी येळणे, प्राची, शारदा किरपाण ,मंगला काटकर, उषा भिवगडे, सरिका चोखांद्रे, पल्लवी बरबटे, रीना दारोडे, शालेमराज विदुरी, लतिका झाडे, कोमल तिडके व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles