spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस सेवा उपक्रम व वृक्षारोपणाने साजरा

हंसराज, भंडारा :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भंडारा शहराच्या वतीने पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत हा वाढदिवस उत्साहात आणि सेवाभावी वातावरणात साजरा करण्यात आला.

यानिमित्त भंडारा शहराजवळील जनचेतना मूक-बधिर विद्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या हस्ते विद्यार्थी व विद्यार्थिनींना लाडू वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

त्यानंतर भंडारा शहरातील खांबतलाव चौक येथील गोखले बालोद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आवळा, चिंच, बेल, कडूलिंब, करंजी आदी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक सार्व्हे, शहरप्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, उपशहरप्रमुख राजेश ठवकर, प्रकाश गभणे, वाहतूक सेनेचे होमराज उपरीकर, सोमेश्वर सेलोकर, रसिक खोब्रागडे, शामराव मालखंडाळे, आशिष गणवीर, गोपीचंद गोमासे, नितेश गभणे, अरविंद ठवकर, राजू लांजेवार, प्रकाश कुंभलकर, मिताराम जीभकाटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.