– उपाध्यक्षपदी मनोज भुजबळ, गजानन कोल्हे आदींची नियुक्ती
मुंबई :- भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार भाजपा प्रदेश सरचिटणीस व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आ. योगेश सागर आणि ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी ओबीसी मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. उपाध्यक्षपदी मनोज भुजबळ (रायगड), गजानन कोल्हे (अमरावती), शरद पाटील (हिंगोली), सरचिटणीसपदी विनोद दळवी, विक्रांत चांदवडकर आणि शितल शिंदे आदींची आणि कोषाध्यक्षपदी मनोज ब्राह्मणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.





