spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तिघई शिवारात सोलर पंपाचे केबल व साहित्य चोरीला, अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्याचे सुमारे १२ हजारांचे नुकसान

खापा, वार्ताहर :- खापा पोलीस ठाणे हद्दीतील मौजा तिघई शिवारात शेतातील सौर मोटरपंपाचे केबल व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्याचे सुमारे १२ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

रेल्वेस्टेशन रोड, सावनेर येथील रहिवासी डॉ. प्रमोद डोंगरे यांची तिघई शिवारात सातबारा क्रमांक १०४/३ मध्ये शेती आहे. शासकीय योजनेअंतर्गत त्यांच्या शेतात २६ मार्च रोजी सौर मोटरपंप बसविण्यात आला होता. शेतीसाठी या सौर पंपाचा उपयोग केला जात होता.

दरम्यान, डॉ. डोंगरे हे १८ ऑगस्ट मंगळावरला शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता सौर मोटरपंपापर्यंत जाणारे केबल तसेच इतर साहित्य गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अज्ञात चोरट्यांनी सदर साहित्य चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी तिघईचे पोलीस पाटील रुमाकांत खडके यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर खापा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रारीची दखल घेत पोलीस हवालदार प्रकाश नांदूरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरीस गेलेल्या साहित्याचा व आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत असून, शेतशिवारात वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.